Kolhapur Gokul chairman election latest news
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर होणारी अध्यक्ष निवडीची संचालकांची बैठक ही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बोलवली असल्याने त्या सभेला सर्व संचालकांना उपस्थित राहाणे अनिर्वाय असल्याचे सहकारातील तज्ज्ञांचे मत (Kolhapur Gokul chairman election latest news) आहे. पहिल्याच सभेला अनुपस्थित राहण्याची संबंधित संचालकांना परवानगी देणे अधिकाऱ्यांच्या कक्षेत येते की नाही? हाही प्रश्न असल्याचे तज्ज्ञ सांगतात.