Gokul Kolhapur chairman election November 10
esakal
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या कायदेशीर संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर सर्किट बेंचने आज (ता. २) महत्त्वपूर्ण आदेश देत १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सात दिवसांची नोटीस देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आता १० नोव्हेंबरला होणार असल्याचे निश्चित झाले आहे.