कोल्हापूर : फाट्यापासून घरापर्यंत रस्त्याची स्वच्छता झाली, डीडीटी पावडर फवारणी झाली, स्वागत कमानी कोठे कोठे उभा करायच्या, याचेही नियोजन झाले. सकाळी दारात छोटा मंडप उभा केला आणि रात्रीत नाव बदलले. गोकुळ दूध संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत (Shashikant Chuyekar) यांच्या वाट्याला आज निराशा आली. स्वतःच्या वडिलांनी उभा केलेल्या संघात आपले असे काहीच मत नसल्याचे पाहून त्यांचे डोळे पाणावले.