Shashikant Patil-Chuyekar chairman post latest update
esakal
कोल्हापूर : गोकुळ संघाच्या उभारणीत आयुष्य वेचणाऱ्या स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या कष्टांची परतफेड त्यांच्या मुलाला अध्यक्षपदाची संधी देऊन करा, अशी भावनिक साद चुये (ता. करवीर) ग्रामस्थांनी (Shashikant Patil-Chuyekar chairman post latest update) घातली. गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या मुख्य कार्यालयासमोर असणाऱ्या स्व.चुयेकर यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होत शशिकांत पाटील-चुयेकर यांना न्याय मिळावा, यासाठी साकडे घातले.