Kolhapur Gokul election 2026
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. चार सप्टेंबरला अंतिम यादी जाहीर होणार (Kolhapur Gokul election 2026) असून, साधारण १०-११ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. सोमवार (ता. ३१) पासून निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीपासून कार्यालय कोठे घ्यायचे, इंथपर्यंतची प्रक्रिया वेग घेणार आहे.