Satej Patil statement on Gokul election 2026
esakal
कोल्हापूर : सध्या गोकुळच्या बिनविरोध निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही. जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यासाठी गोकुळमध्ये एकहाती सत्ता असणे अत्यंत गरजेचे (Gokul Election 2026) आहे. त्यामुळे ही निवडणूक मी पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.