Gokul Election 2026 Satej Patil statement on Mahayuti
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीनिमित्त महायुतीत अंतर्गत कलहाची सहा महिन्यांपूर्वीच ठिणगी पडली होती. काल त्याचा वणवा (Kolhapur Gokul Election 2026) पेटला. ‘गोकुळ’ निवडणुकीत महायुतीसोबत जाणे म्हणजे आत्महत्या केल्यासारखे आहे, हे सभासदांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ठरावाचे कोणी कितीही दावे केले तरी सभासद समविचारी आघाडीसोबतच राहून निकालादिवशी बिनआवाजाचा बाँब फोडतील, असे मत आमदार सतेज पाटील यांनी आज व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.