Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
esakal
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला आज मुंबईतही ठरला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रात्री महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक (Gokul Milk Union election Mahayuti seat sharing formula) झाली. येथे प्रत्येकाने आपली बाजू मांडली; मात्र निर्णय झाला नाही. अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.