'एका नेत्याच्या आदेशावरून गोकुळची सभा उधळून लावली' 

kolhapur gokul meeting 2021
kolhapur gokul meeting 2021
Updated on: 

कोल्हापूर - "गोकुळ संघाचे दूध संकलन वाढविण्यात संचालकांचा नाकर्तेपणा तसेच गरज नसताना विस्तारीकरणवर शंभर कोटींचा खर्च, मल्टीस्टेट, दूध उत्पादकांना मिळणारा कमी दर अशा गैरव्यवहारांबाबत सभेत चर्चाच होऊ द्यायची नसल्याने एका नेत्याच्या आदेशावरून सभा उधळून लावली गेली.'' असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांच्या अध्यक्षते खाली आज झाली. यात सभासदांच्या प्रश्‍नाना उत्तरचे मिळाली नाहीत असा आरोप करीत श्री देवकर म्हणाले की, "" सभेत मल्टी स्टेटचा विषय लपवला आहे. भविष्यात मल्टीस्टेट आणण्याचा प्रयत्न होतो की अशी शंका येते. गोकूळ संचालकांनी शंभर कोटीच्या खर्चाचे संघाच्या विस्तारीकरणाचे काम आणले. त्याची माहिती सभेत दिली नाही. यावर्षी 4 कोटीने संकलन कमी झाले यातून दहा वर्षे संघ मागे गेला आहे. यातून दूध खरेदीबाबत संघाची अनास्था दिसत आहे.'' 
गायीचे खाद्य व संगोपनचा खर्च 32 रूपये येतो. तर गायीच्या दुधाला 27 रूपये खर्च संघ देतो. त्यामुळे गायीचे दुध संकलन 7 कोटीने कमी झाले. या साऱ्यात संघाच्या सभासदावर 76 कोटीचा तोटा बसवला आहे. आदी मुद्दे सभासदांसमोर येऊ द्यायचे नव्हते म्हणून सभा गुंडाळल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले. 

सदाशीव चरापले म्हणाले की, "" दुध संघाचे पाच कोटी रूपये युथ बॅंकेत पडून आहेत. बॅंक अडचणीत आली त्या पैशाला व्याज मिळत नाही तरीही हे पैसे बॅंकेत का आहेत. गोकुळ मध्ये काम करणारे कर्मचारी खऱ्या खुऱ्या दुध उत्पादकांची मुले आहेत का लाखो रूपये घेऊन झालेली नोकरभरती संशयास्पद आहे. संघाचे रोजचे 21 ते 22 कोटी रूपये बचत खात्यावर ठेवले जातात ते फिक्‍स डीपॉझीट्‌ म्हणून ठेवले तर संघाला व्याज मिळू शकते मात्र त्याकडे संचालकांचे दुर्लक्ष आहे. शंभर बल्क कुलरची खरेदी केली मात्र त्याचा वापर पूर्ण क्षमतेने होत नाही.'' 

करणसिहं पाटील म्हणाले की, "" संचालकांच्या सग्या सोयऱ्याना 3 कोटी रूपयांचा माल उदारीवर देण्यात आला. टॅंकर वाहतुकीच्या निविदेसाठी विचित्र अटी घातल्याने नेते किंवा संचालकाच्या सग्या सोयऱ्यांनाच हा ठेका मिळाला आहे. वरील अनेक अवाजवी व्यवहार ऑडीटरच्या सल्ल्यातून तयार झाल्याचा संशय बळावत आहे'' 
किरणसिंह पाटील, मधूआप्पा देसाई, सचिन घोरपडे, विजय मोरे, अमित कांबळे उपस्थित होते. 

निवडणूकीत बघू 
संघाच्या येत्या निवडणूकीत पालक मंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मात्तबर नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल संघाच्या निवडणुकीत उतरेल तेव्हा विद्यमान संचालकांना घरी पाठविण्याचे काम सभासद करतील असेही सुतोवाच या पत्रकार परिषदे श्री. देवकर यांनी केले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com