Gokul Election Objections and Hearing Controversy
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या कच्च्या यादीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव नाही, त्याला इतर संस्थांवर हरकती घेता येणार नाहीत. एका व्यक्तीला एकाच संस्थेवर आक्षेप घेता येईल, असे सहायक दुग्ध उपनिबंधक कृष्णा ठाकरे यांनी सांगितले (Gokul Election Dispute) होते. ज्या संस्थांवर हरकती घेतल्या होत्या, त्यांना नोटीस दिली नसताना थेट मोबाईलवरून मॅसेज टाकून सुनावणीला बोलावता, ही तुमची हुकूमशाही सुरू आहे का? न्यायालय आणि सहकार न्यायालयापेक्षा तुम्ही अधिकारी मोठे झाला का? असा सवाल करत दूध संस्था प्रतिनिधींनी ठाकरे यांना धारेवर धरले.