Satej Patil statement on Gokul multistate controversy
esakal
Gokul Multistate Controversy : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोध करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी दूध उत्पादक आणि ठरावदारांनी आम्हाला सत्ता दिली; पण महायुतीकडून गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा नवीन डाव रचला जात आहे. गोकुळ गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेल को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या घशात घातला जाणार आहे. याला गेल्यावर्षी आमच्यासोबत सत्तेत असणाऱ्यांकडूनही पाठबळ दिले जात आहे. साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या पाठबळाच्या जोरावर महायुतीचा हा डाव मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी पॅनेल प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.