कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या सुमारे अडीच तासांच्या चर्चेअंती ‘गोकुळ’च्या अध्यक्षांच्या (Gokul President Election) नावावर काल सायंकाळी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत शिक्कामोर्तब झाले. आज (ता. ३०) दुपारी दोन वाजता ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडून हे नाव जाहीर होईल. अध्यक्षपदाच्या नावाची लखोटाबंद चिठ्ठी पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.