कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्सचा एजंट बनून कोट्यवधींची कमाई करणाऱ्या गोल्डनमॅन ऊर्फ संदीप वाईंगडेने (Sandeep Vaingade Scam) स्वतःचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला होता. अनेकांना गंडा घालून रुबाबात फिरणाऱ्या या एजंटाने ग्रामपंचायत निवडणुकीतही (Gram Panchayat Election) आपले नशीब आजमावले होते. मात्र, त्याला केवळ १९० मतांवर समाधान मानावे लागले होते. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर उचगाव परिसरात त्याच्या विविध कारनाम्यांची चर्चा सुरू झाली आहे.