Kolhapur Municipal Commissioner Warns 11 Neighbouring Gram Panchayats of Water Supply Disconnection Over Pending Dues
esakal
कोल्हापूर : शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टीचे मुद्दल व विलंब आकाराची आठ कोटी ८० लाख ६३ हजारांवर थकबाकी आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत ५० टक्के मुद्दलचा भरणा न केल्यास त्या ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा तोडण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज दिला. २५ टक्के रक्कम डिसेंबरअखेर व उर्वरित २५ टक्के रक्कम मार्चअखेर भरण्याच्या सूचना केल्या.