कोल्हापूर : ग्रीन काँरिडाँर मधील वाहनास अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात

कोल्हापूर : ग्रीन काँरिडाँर मधील वाहनास अपघात

नसरापूर : पुणे येथील रूबीहाँल क्लिनिक मध्ये यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी कोल्हापुरहुन पुण्याकडे यकृत आणणारया रुग्णवाहिकेला सातारा महामार्गावर किकवी ता.भोर गावच्या हद्दीत अपघात झाला मात्र राजगड पोलिस ठाण्या अंतर्गत किकवी पोलिस चौकीच्या कर्मचारयांनी तातडीने दुसरया रुग्णवाहीकेसह अपघातस्थळी धाव घेत अपघातातील किरकोळ जखमींना मदत करत अपघातग्रस्त रुग्णावाहीकेतील यकृत योग्य वेळेत रुबीहाँल क्लिनिक मध्ये पोहचवण्यात यश मिळवले.

यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुबीहाँल क्लिनिकची रुग्णवाहीका एम एच 14 जे एल 8805 ही कोल्हापुरहुन यकृत घेऊन दोन डाँक्टरांसह पोलिस पायलट वाहनासह ग्रीन काँरिडाँर मधुन पुण्याकडे येत असताना दुपारी साडेबारा बाजता पुणे-सातारा महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत हाँटेल कृष्णा समोर रुग्णवाहीकेचा पुढील टायर अचानक फुटला त्यामुळे रुग्णावाहीका पलटी झाली या वेळी रुग्णवाहीके मध्ये असलेले दोन डाँक्टर,चालक व त्याचा सहकारी असे चार जण होते त्या मधील दोघेजण किरकोळ जखमी झाले.अपघाता नंतर पोलिस पायलट वाहनाने तातडीने किकवी पोलिस चौकीशी संपर्क साधला व अपघाताची माहीती देऊन

रुग्णवाहीकेत यकृत असुन पुण्याकडे वेळेत जाणे गरजेचे असल्याचे सांगितल्यावर किकवी पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ व सहकारयांनी किकवी येथील नरेंद्र महाराज संस्थांनची रुग्णवाहीका (क्र.एम एच 16 क्यु 9872) व त्याचे चालक तुळशीराम आहिरे यांना घेऊन अपघातस्थळी धाव घेतली अपघातातील किरकोळ जखमी व प्रत्यारोपण करावयाचे यकृत घेऊन तुळशीराम आहीरे यांना रुग्णवाहीकेसह तातडीने रुबीहाँल क्लिनिकला पाठवले.

किकवी पोलिसांनी केलेल्या तातडीने यकृत रुबीहाँल क्लिनिकला वेळेत पोहचले व शस्त्रक्रिया वेळेत होणे शक्य झाले. राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी किकवी चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ पोलिस कर्मचारी व किकवी येथील रुग्णावाहीका चालक तुळशीराम आहिरे यांचे अभिनंदन केले आहे. केली आहे.