esakal | पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला गणेश मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur guardian minister conference call with ganesha mandal

पोलीस अधिक्षक कार्यालयातून पालकमंत्री सतेज पाटील यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यात जमलेल्या कार्यकर्त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  सकाळी अकरा ते दुपारी सव्वा दोन पर्यंत  चर्चा केली.

पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला गणेश मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर :  विद्युत रोषणाई, देखावे टाळावे, साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, मिरवणुका काढू नयेत, या  पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अवाहनाला आज मंडळातील कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे या वर्षी गणेश उत्सवातील आगमन आणि विसर्जन मिरवणुका होणार नसल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. 

मंत्री पाटील यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे पोलीस ठाण्यात जमलेल्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. तसेच यावेळी काही कार्यकर्त्यांनी 10 बाय 10 फुटाचा मंडप खूप कमी होत असल्याने, महापालिकेने त्याचा आकार 15 बाय 15 फूट करावा, अशी मागणी केली. त्यालाही मान्यता देण्यात आली.

पोलीस अधिक्षक कार्यालयातून पालकमंत्री सतेज पाटील यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यात जमलेल्या कार्यकर्त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  सकाळी अकरा ते दुपारी सव्वा दोन पर्यंत  चर्चा केली. यामध्ये कोरोना महामारीचे संकट पाहता सर्वांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा, विद्युत रोषणाई देखावे शक्यतो टाळावेत, सोशल डिस्टन्स मास्क व इतर नियम काटेकोरपणे पाळावेत, असेही आव्हान मंत्री पाटील यांनी केले. 

राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी गणपतीची मूर्ती यापूर्वीच ठरविलेली आहे. त्यामुळे  15 बाय 15 फूट मंडपाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी याला मान्यता दिली. तसेच ट्रॅक्टर ट्रेलर प्रत्येक मंडळाजवळ अपेक्षित असून त्यावरच मूर्तीची प्रतिष्ठापणा करवी, असेही आवाहन मंडळांना करण्यात आले. कार्यकर्त्यांनी अनेकांना हे शक्य नसल्याचे सांगितल्याने. ज्या ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉली शक्य नाही, त्या ठिकाणी मंडप घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हे पण वाचाब्रेकिंग - कोल्हापूरकरांना दिलासा; राधानगरीचे दोन दरवाजे बंद 
 
जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह इतर अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.        

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top