Radhanagari Dam 97 percent full update
esakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील नऊ धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस पडला. गगनबावडा तालुक्यातील कोदे धरण क्षेत्रात २४ तासांत २१४ मिमी. पाऊस झाला. या पावसाळ्यातील अतापर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस (Radhanagari Dam water level today) आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली असून, रात्री १० वाजता पाणीपातळी ३२ फूट १० इंच होती.