organic honey production in Kolhapur forest areas
esakal
कोल्हापूर : जागतिक तापमान वाढीमुळे उष्णतेत वाढ झाली. पावसाचा कालावधी आणि प्रमाण (40 percent decline in Kolhapur honey production) बदलले. त्यामुळे मधमाश्यांच्या वसाहती स्थलांतरित झाल्या किंवा त्यातील माशा मृत झाल्या. परिणामी, खादी ग्रामोद्योगच्या मध संकलनात दरवर्षीपेक्षा यावर्षी ४० टक्के घट झाली. जंगलाच्या आतील भागात आढळणारा सेंद्रीय मधही कमी झाला आहे. त्याचा परिणाम मधुमक्षिका पालन व्यवसायावर झाला आहे.