Kolhapur Commercial Gas : आलिशान हॉटेलमध्ये आता लाकडाची चूल; हातगाडीवरील पोहे, वडा-भजी बंद, व्यावसायिकांसमोर अनेक आव्हाने

Food Business Crisis : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याचा मोठा परिणाम कोल्हापुरातील हॉटेल आणि खाद्य व्यवसायावर दिसू लागला आहे. अत्याधुनिक स्वयंपाकघर असलेल्या आलिशान हॉटेलमध्येही आता लाकडाच्या चुली पेटताना दिसत आहेत.
Hotel Industry Crisis 

Hotel Industry Crisis 

sakal

Updated on

कोल्हापूर : आलिशान हॉटेल, त्यामध्ये अत्याधुनिक स्वयंपाकघर, विविध प्रकारची उपकरणे; मात्र स्वयंपाकासाठी लाकडे असणारी चूल मांडली आहे. अशी विसंगती शहरातील विविध हॉटेल्समध्ये पाहायला मिळत आहे. आखाती युद्धामुळे शहरातील व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्याचा हा परिणाम असून, हॉटेल व्यावसायिकांना एकाचवेळी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com