'हुपरीचे उपनगराध्यक्ष भरत लठ्‌ठे यांना बांगड्‌यांचा आहेर करू'

kolhapur hupari municipal corporation bharti latte
kolhapur hupari municipal corporation bharti latte

हुपरी : सहा महिन्याचा कालावधी ठरला असताना तब्बल दोन वर्ष झाली तरी अजून भरत लठ्‌ठे यांची उपनगराध्यक्ष पदाची हौस फिटलेली नाही. महत्वाची पदे आणि प्रतिष्ठा देऊन भाजपने त्यांचा नेहमीच सन्मान केला आहे. असे असताना उलट भाजपच्याच महिला नगरसेवकां विरोधात त्यांची खेकटेबाजी सुरू आहे. लठ्‌ठे यांनी वेळीच शहाणपणा दाखवावा अन्यथा एक दिवस आम्हीच त्यांचा सत्तेचा माज उतरवू, असा घणाघात येथील भाजपच्या चार महिला नगरसेविकांनी उपनगराध्यक्ष भरत लठ्‌ठे यांच्यावर पत्रकार बैठकीत केला.

भरत लठ्‌ठे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा न दिल्याने भाजप अंतर्गत नगरसेवकांत असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका लक्ष्मी साळोखे, सुप्रिया पालकर, ऋतुजा गोंधळी, अनिता मधाळे आदींनी पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी नगराध्यक्षा जयश्री गाट उपस्थित होत्या.

नगरसेविका सुप्रिया पालकर म्हणाल्या, ""आम्ही पक्षाशी एकनिष्ठ असतांना पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवत आज इथे तर उद्या तिथे असे स्वार्थी राजकारण करणाऱ्या भरत लठ्‌ठे यांनी आमच्यावर पद अपात्रतेची कात्री चालवली आहे. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू. प्रसंगी त्यांना बांगड्‌यांचा आहेर देखील करू.''
लक्ष्मी साळोखे म्हणाल्या, ""पालिकेत अथवा बाहेर भाजप वाढीसाठी पदाधिकारी म्हणून लठ्‌ठे यांचे योगदान शून्य आहे. पदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. त्यांचे स्वार्थी राजकारण लवकरच मोडून काढणार आहोत.''

ऋतुजा गोंधळी म्हणाल्या, ""सर्व महिला नगरसेवकांचा उपनगराध्यक्ष पदाने सन्मान करण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांनी घेतला असतांना पक्षप्रतोद सह उपनगराध्यक्ष पदही आपल्याकडेच हा लठ्‌ठे यांचा अट्टाहास कशासाठी. त्यांनी वेळीच पदाचा राजीनामा द्यावा.'' कोल्हापूर कोल्हापूर 

नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी महिला नगरसेवकांच्या भुमिकेचे समर्थन केले. उपनगराध्यक्ष लठ्‌ठे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत असून महिला नगरसेवकांच्या पाठीशी ठाम असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अमित गाट, पक्षप्रतोद रफिक मुल्ला आदी उपस्थित होते.

हे पण वाचाहुपरी- तळंदगे मार्गावर चांदी व्यवसायिकास लुटले
 
लठ्‌ठे यांचा बोलावता धनी वेगळा..!
बैठकीत सर्वच नगरसेविकांनी भरत लठ्‌ठे यांचा बोलावता धनी वेगळाच असल्याचा आरोप स्थानिक नेते अण्णासाहेब शेंडुरे यांचे नांव न घेता केला. या नेत्याची फुस असल्यानेच लठ्‌ठे यांचे पक्ष विरोधी कारवाया करण्याचे धाडस वाढले असून त्यांचा लवकरच बंदोबस्त केला जाईल, असा इशारा दिला.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com