Municipal Election : अखेर प्रतीक्षा संपली! कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा बिगुल; मतदान १५ जानेवारीला
First-Ever Ichalkaranji Municipal Election : दहा वर्षांनंतर कोल्हापूर आणि इचलकरंजीत पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होणार असून, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती–महाविकास आघाडीमध्ये कडवी लढत होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर / इचलकरंजी / मुंबई : गेली पाच वर्षे लांबलेल्या, दहा वर्षांपूर्वी मतदान झालेल्या कोल्हापूर महापालिकेसाठी तर पहिल्यांदाच इचलकरंजी महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.