Collector Amol Yedage
esakal
कोल्हापूर : कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची (Kolhapur Municipal Election Results) मतमोजणी आज, शुक्रवारी (ता. १६) पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीदरम्यान तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedage) यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशांनुसार विजयी मिरवणुका काढणे, तसेच फटाके फोडण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे.