Kolhapur Illegal Abortion Case : 300 गर्भपातांची कबुली अन् 'मुलगाच' होण्याचे औषध! डॉ. गायकवाडच्या काळ्या कारनाम्यांचा कोल्हापुरात भांडाफोड, 40 महिलांची नावे पोलिसांच्या हाती

Illegal Abortion Racket Investigation in Kolhapur : कोल्हापुरातील बेकायदा गर्भपात प्रकरणात पोलिस तपास वेगाने सुरू असून, डॉक्टरने कथितपणे शेकडो गर्भपात, मुलगा होण्याचे औषध वितरण आणि एजंटांच्या मदतीने रॅकेट चालवल्याचा संशय तपासात समोर आला.
Kolhapur illegal abortion case investigation

Kolhapur illegal abortion case investigation

esakal

Updated on

कोल्हापूर : तीनशे गर्भपात केल्याची कबुली देणारा डॉ. चंद्रकांत गुंडू गायकवाड (वय ७८) याने अनेकांना ‘मुलगाच’ होण्याचे औषध दिल्याचेही तपासात समोर आले आहे. गर्भपात केल्यानंतर अर्भके फेकण्यासाठी तो संबंधित एजंटाकडे Dr (Chandrakant Gaikwad latest news) द्यायचा. या एजंटांना कमिशनसोबत वेगळा ‘कट’ देत डॉ. गायकवाडने अनेकांना या रॅकेटमध्ये सामील करून घेतले होते. गायकवाडने गर्भपात केलेल्या जवळपास ४० महिलांची नावे पोलिसांना मिळाली असून, त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com