Kolhapur: मोकाट गुंडांना ‘मोक्याचा डोस' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

कोल्हापूर : मोकाट गुंडांना ‘मोक्याचा डोस'

कोल्हापूर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास पोलिस यंत्रणेने सुरुवात केली आहे. १५ दिवसांत १६ जणांवर थेट मोका अंतर्गत कारवाई करून त्याची झलक पोलिसांनी दाखवून दिली. भागात वर्चस्व निर्माण करण्यासाठी फाळकूटदादा नेहमी सक्रिय असतात. किरकोळ कारणावरूनही हाणामाऱ्या करायच्या, यातून एकाद्या गुन्ह्याचा शिक्का अंगावर लावून घ्यायचा.

बाहेर आल्यावर भागात दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न फाळकूटदादांचा असतो. अशाच फाळकूटदादांचे फलक भागात झळकतात. बघता बघता त्याच्या साईटरांची संख्या वाढते. यातून गँग तयार होईल, अशी भीती निर्माण होते. जिल्ह्यात कोरोना निर्बंधात शिथिलता दिल्यानंतर फाळकूटदादांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत पोलिस दप्तरी झालेल्या हाणामारीच्या नोंदींवरून त्याचे स्वरूप लक्षात येते. एकमेकांकडे बघणे, पूर्ववैमनस्य, प्रॉपर्टीचा वाद, आर्थिक व्यवहार, अशा कारणातून या हाणामाऱ्या झाल्याची कारणे आहेत.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

यातील अनेक हाणामाऱ्यांत शस्त्राचाही वापर केला. एवढेच नव्हे तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रकारही स्टेशनरोड परिसरात घडल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली. जिल्ह्यातील डोके वर काढू पाहणाऱ्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिस यंत्रणा पुन्हा आक्रमक झाली आहे.

हाणामाऱ्या करणाऱ्या फाळकूटदादांवर प्रतिबंधात्मक कारवाईपासून झोपडपट्टी दादा (एनपीडीए ॲक्ट) अंतर्गत कारवाईचा धडाका सुरू केला. त्याचबरोबर डोके वर काढणारी संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यास सुरुवात केली. याच अंतर्गत जवाहरनगरातील आर.सी. गँगमधील दहा सदस्यांवर मोका अंतर्गत पोलिस यंत्रणेने कारवाई केली. त्यापाठोपाठ राजारामपुरी, जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन अशा गेल्या पंधरा दिवसांत एकूण १६ जणांवर मोका अंतर्गत कारवाई करत पोलिस यंत्रणेने आक्रमक पवित्र्याची झलक दाखवली. पोलिसांच्या या भूमिकेबद्दल सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

मोका कारवाईचा तपशील

वर्ष कारवाई संशयित अटक

२०१८ १८ १३३ १०९

२०१९ १३ ११५ १०२

२०२० ४ २४ २३

२०२१ ७ ३९ २९

loading image
go to top