Kolhapur : पन्हाळागडावरील ‘चार दरवाजा’चे अंतरंग खुलणार: सौंदर्यांत पडणार भर; पुरातत्त्व विभागाकडून काम सुरू
सध्या चार दरवाजाचा पूर्वेकडील बुरूज बांधून पूर्ण होत असून त्याच्या पुढील दरवाजाचे खोदकाम सुरू आहे. याच दरवाजावर मातीचा भराव पडल्याने नगरपरिषदेने जकात नाक्याची इमारत उभी केली होती.
कोल्हापूर : पन्हाळ्यावरील ‘चार दरवाजा’चे अंतरंग आता पुन्हा खुलणार आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याकडून त्याचे काम सुरू असून, ते प्रगतीपथावर आहे. यामुळे पन्हाळ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.