
कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत गेल्या तीन दिवसांत साडेदहा हजार कांदा पोत्याची आवक झाल्याने कांद्याचे भाव उतरले आहेत. यात सरासरी २३० रुपये दहा किलो, असे घाऊक भाव झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव खाली येतील, अशी अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात शंभर रुपये प्रती एक किलो कांद्याचा भाव झाले होता. त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहक वर्गाला दिलासा मिळाला आहे.