
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये हस्तक्षेप नाही; लक्ष देऊ
कोल्हापूर: दुधाची वाढती मागणी पाहता, ते दूध कमी प्रतीचे आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. ‘गोकुळ’मध्ये सत्ता मिळवण्यासाठी उत्पादकांना आम्ही अभिवचन दिले आहे. त्यामुळे आम्हाला लक्ष द्यावे लागले, आमचा हस्तक्षेप नाही, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली तर कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा हे पाच जिल्हे दूध संघांकडून संकलित होणाऱ्या दुधाचा ‘गोकुळ’ एकच ब्रॅंड करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, ‘गोकुळ’मध्ये सतेज पाटील यांचा हस्तक्षेप होतो; पण मुश्रीफ यांचा होत नाही, म्हणून दोघांत भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांना केले. श्री. पाटील, श्री. मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये सत्ता परिवर्तन करताना आम्ही नेतृत्व केले आहे; पण आम्ही लक्ष द्यायचे नाही का? निवडणुकीत लोकांना आणि उत्पादकांना चार पैसे जास्त मिळवून देण्यासाठी अभिवचन दिले. आम्हाला मोठ्या विश्वासाने सत्ता दिली. आम्ही त्यांच्याशी बांधिल आहोत, उद्या काहीही घडले तर त्याला जबाबदार आम्हीच आहे. ‘गोकुळ’मध्ये आमचा हस्तक्षेप नाही; पण आम्हाला लक्ष दिलेच पाहिजे, त्यामुळे दोन्ही बाजूंनी हलगी वाजवू नका, अशी विनंतीही त्यानी केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, दूध उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा बॅंकेतर्फे ५०० कोटींहून अधिक कर्ज दिले. म्हशीच्या दुधात वाढ झालीच पाहिजे. तीन ते चार महिन्यांत उष्णता वाढली, त्यामुळे दूध संकलनही घटले. दूध संकलनासाठी संघाला प्रयत्न करावे लागणार आहेत. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत राहतील, मात्र, संघावर परिणाम होईल, अशा गोष्टी संचालकांनी टाळल्या पाहिजेत.
Web Title: Kolhapur Interference Gokul Pay Attention
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..