
Kolhapur Crime : दारू, रिमझिम, फुलचंदची ‘झिंग’ करणारी कोल्हापूरची तरुणाई आता ‘हायप्रोफाईल’ नशेकडे वळल्याचे चिंताजनक चित्र आहे. ‘वीकेन्ड’च्या नावाखाली डोंगरातील फार्महाउस बुक करायचे. नशेची शेवटची हद्द पार करत स्विमिंग टॅंकमध्ये दिवसभर डुंबायचे. रात्रभर मोठ्या आवाजात नाचगाण्यांवर धिंगाणा घालायचा. अलीकडे ‘ट्रिपच्या’ नावाखाली सुरू झालेल्या या पार्ट्यांचे पुरवठादारही गोवा, कर्नाटक, ओडिशातून ‘कोल्हापुरात’ दाखल होत आहेत.