

Minister Ashish Shelar participates
sakal
कोल्हापूर : जलतीर्थ स्वच्छता मोहिमेचा कोल्हापुरी पॅटर्न राज्यभर राबवणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी केली. कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, सकाळ माध्यम समूह, कोल्हापूर महापालिका, जिल्हा प्रशासनासह विविध संस्था व संघटनांच्या पुढाकाराने आज झालेल्या जलतीर्थ कोल्हापूर मोहिमेवेळी टाकाळा येथे ते बोलत होते.