11-year-old boy death at CPR Hospital
esakal
कंदलगाव : ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) ने काल कळंबा येथील राजवर्धन नितीन बुचडे (वय ११, सध्या रा. महालक्ष्मी गल्ली, कळंबा, मूळ गाव कुडित्रे) याचा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कळंबा गावात घरोघरी आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली (Guillain Barre Syndrome cases in Kalamba Kolhapur) आहे. महालक्ष्मी गल्ली, राम गल्ली, हनुमान गल्ली, टिपुगडे गल्ली आणि तिवले गल्ली येथे तपासणीवर भर आहे. जिल्हा परिषद सदस्या विनीता भोगम आणि सरपंच सुमन गुरव यांनी आवाहन केले की, नागरिकांनी न घाबरता आरोग्य यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे.