

kolhapur crime
esakal
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. निगवे खालसा या गावामध्ये गाभण असलेल्या गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गायीच्या गोठ्यात टाचण्या टोचलेले लिंबू, भात आणि त्यावर गुलाल टाकलेला आढळून आला. त्यावरुन हा भानामतीचा प्रकार करुन अंधश्रद्धा पसरवल्याचं दिसून येतंय. या गायीची हत्या झाल्याने अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.