KDCC Bank Decision : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना! पात्र शेतकऱ्यांच्या व्याजाचा भार 'केडीसीसी' उचलणार; नफ्यातून भरणार 10 कोटींहून अधिक रक्कम

Kolhapur Farmer Loan Waiver Scheme 2026 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे १ एप्रिल २०२६ नंतरचे सुमारे १० कोटी रुपयांचे व्याज केडीसीसी बँक स्वतः भरणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
Kolhapur farmer loan waiver latest news

Kolhapur farmer loan waiver latest news

esakal

Updated on

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील पात्र शेतकऱ्यांच्या व्याजाचा भार जिल्हा मध्यवर्ती बॅंक (केडीसीसी) स्वतः उचलणार आहे. सुमारे १० कोटींहून अधिक व्याजाची ही रक्कम बँक स्वतःच्या नफ्यातून व्याजापोटी भरणार (KDCC Bank interest payment for farmers) आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com