Kolhapur Crocodile Terror : खोची-दुधगाव रस्त्यावर 15 फुटी महाकाय मगरीची दहशत! मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून बसल्याने प्रवाशांची भंबेरी

Giant crocodile on Khochi Dudgaon road : कोल्हापुरातील खोची-दुधगाव मुख्य रस्त्यावर १२ ते १५ फुटांची मगर दररोज दिसत असल्याने प्रवासी, शेतकरी आणि ऊसतोडणी कामगारांमध्ये भीती पसरली असून वनविभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी होत आहे.
Giant Crocodile Spotted Daily on Khochi-Dudgaon Main Road

Giant Crocodile Spotted Daily on Khochi-Dudgaon Main Road

esakal

Updated on: 

खोची (जि. कोल्हापूर) : येथील खोची-दुधगाव मुख्य रस्त्यावर दुधगाव गोंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात रोजच मोठ्या मगरीचा वावर वाढल्यामुळे प्रवासी व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. १२ ते १५ फूट लांबीची मगर रोज सायंकाळी व रात्री बिनधास्तपणे मुख्य रस्त्यावर वावरत (Crocodile sightings in Khochi village) आहे. वनविभागाकडून मगरीचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी, शेतकऱ्यांतून होत आहे.

Loading content, please wait...