Why was woman doctor assaulted in Kolhapur?
esakal
कुडित्रे (कोल्हापूर) : खुपिरे येथील ग्रामीण रुग्णालयात एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार (Kolhapur rural hospital assault case) घडला. शासकीय कामात अडथळा आणून दहशत निर्माण करणाऱ्या रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी जन सत्तूर सहेरिया (वय ३२, रा. खुपिरे) याच्याविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.