कोल्हापूर : व्यावसायिकावर चाकूहल्ला; हल्लेखोरास नागरिकांचा चोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरकोळ वादातून पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

कोल्हापूर : व्यावसायिकावर चाकूहल्ला; हल्लेखोरास नागरिकांचा चोप

कोल्हापूर: खर्चाला पैसे दिले नाहीत म्हणून रेकॉर्डवरील गुन्हेगाराने व्यावसायिकावर चाकूहल्ला केला. भरवस्तीत छत्रपती शिवाजी चौकात आज रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. यात व्यावयासिक सागर श्रीकांत शिंदे (वय ४५) जखमी झाले. दरम्यान, हल्ला करून पळून जाणाऱ्या सुमित ऊर्फ लाल्या खोंद्रे (रा. धोत्री गल्ली) याला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जखमी शिंदे यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार झाले.

पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांचा इलेक्ट्रिकचे सुटे भाग विक्रीचा व्यवसाय आहे. ते शहाजी तरुण मंडळाचे पदाधिकारीही आहेत. रात्री ते शिवाजी चौकात थांबले होते. तेथे संशयित हा खोंद्रे आला आणि त्याने खर्चासाठी पैशाची मागणी केली. ‘मला हप्‍ता दे नाही, तर तुला सोडणार नाही’ असे धमकावले. येथे शिंदे यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याला विरोध करून पोलिसांत तक्रार करतो, असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे चिडून खोंद्रेने चाकूने शिंदे यांच्‍या खांद्यावर व पाठीवर चाकूने वार केला. यानंतर खोंद्रे पळत पापाची तिकटीकडे निघाला होता. चौकातील तरुण व नागरिकांनी धावत जाऊन खोंद्रेला पकडून चोप दिला. याची माहिती मिळताच पोलिस तेथे आले. नागरिकांनी त्याला पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले.

पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, जुना राजवाडा ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, लक्ष्मीपुरी ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव यांनीही सीपीआरमध्ये धाव घेऊन जखमीकडून माहिती घेतली. गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू असल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. दरम्यान, शिवाजी चौक वर्दळीचा आहे. तेथे रात्री ही घटना घडल्यामुळे तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी उशिरापर्यंत तेथे बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Kolhapur Knife Businessman Civilians Attacker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top