कोल्हापूर : लक्ष्मी विलास पॅलेसमधील वस्तुसंग्रहालयास निधी देऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur

Kolhapur : लक्ष्मी विलास पॅलेसमधील वस्तुसंग्रहालयास निधी देऊ

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेले लक्ष्मी विलास पॅलेस येथील वस्तुसंग्रहालयातून प्रत्येक व्यक्ती सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केली. संग्रहालय खुले करण्यात आल्याची घोषणा करत त्यांनी संग्रहालयाच्या पुढील टप्प्याच्या कामासाठी निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही दिली.

कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

पाटील म्हणाले, ‘शाहू महाराजांचा समतेचा विचार लोकांसमोर नेण्यासाठी शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी वर्षात वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. शाहू राजांचा समतेचा व सर्वधर्म समभावाचा विचार सर्वदूर पोहोचवा. त्यांचे विचार आणि कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे असून, हे विचार भावी पिढीला प्रेरणा देणारे आहेत. वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे विचार, कार्य आणि इतिहास नव्या पिढीसमोर नक्की आणला जाईल.’ मुश्रीफ म्हणाले, ‘शाहू महाराज यांनी केलेले परिर्वतन व समतेसाठी केलेले काम हिमालयासारखे आहे. सामान्यांच्या हितासाठी स्वत:चा खजिना रिकामा करणाऱ्या राजाने समतेचा पाया रचला. त्यांचे निर्णय आजही मार्गदर्शक व प्रेरणादायी असून, त्यांनी घेतलेल्या समाजाभिमुख निर्णयाचा वसा पुढे नेण्याचे काम राज्य शासनातर्फे होत आहे.’

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण, महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, बबन रानगे, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक उपस्थित होते.

Web Title: Kolhapur Lakshmi Vilas Palace Museum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..