
विधानसभेला चाचपणी झाली. पण अनपेक्षित निकालाने अनेकांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नेता आणि पक्ष ठरवावा लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. जिंकण्याची क्षमता असणारे इच्छुक आपल्या बाजूला कसे येतील यासाठी राजकीय पक्षांची आणि नेत्यांचीही बोलणी सुरू आहेत. पालकमंत्री कोण होणार, कोणाला मंत्रिपद मिळणार? याकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून पुढील काळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेकांनी आपल्या प्रभागांची आणि जिल्हा परिषद मतदारसंघाची बांधणी करून घेतली. काहींनी मतांची चाचपणीही केली. त्यातच अनेकांसाठी विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागले