कोल्हापुरात लॉकडाऊन शिथिल; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

कोल्हापुरात लॉकडाऊन शिथिल; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

मुख्य लक्ष्मीपुरी बाजारात मात्र पोलिस दिसत होते

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur district) कडक लॉकडाऊन (lockdown) रात्री संपताच आज सकाळी सात ते अकरा दरम्यान ग्राहकांनी खरेदीसाठी झुंबड उडवली. भाजीपाल्यासह धान्य, आंबे, चक्क वडापाव घेण्यासाठी सुद्धा ग्राहकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी रास्त धान्य भाव दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. एकंदरीतच कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याचा परिणाम आज सकाळी दिसून आला.

शहरातील मुख्य बाजार असणाऱ्या ठिकाणी भाजीपालासह इतर विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र रस्त्याच्या कडेला थांबून विक्री करण्यासाठी भाजी विक्रेत्यांना परवानगी आहे. परिणामी शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर गर्दी (mob of people) जाणवत होती. शिंगोशी मार्केट परिसरातील (market open) फुलबाजार सुद्धा आज मिरजकर तिकटी परिसरातील रस्त्यावरच भरला होता. सकाळच्या टप्प्यात वीस- पंचवीस रुपये किलोने मिळणारा गलाटा साडेनऊ दहा नंतर 30 ते 40 रुपये करण्यात आला.

कोल्हापुरात लॉकडाऊन शिथिल; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
संभाजीराजेंचा राज्यभर दौरा; मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवणार

कोळेकर तिकटी मिरजकर तिकटी याठिकाणी पोलिस स्वतः थांबून रस्त्याकडील पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेरच विक्रीसाठी थांबू देत होते मात्र ग्राहक दुचाकीसह विक्रेत्यांना समोर थांबत असल्याने अधिक गर्दी जाणवत होती. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मीपुरी भाजी मंडईमध्ये मात्र गर्दीच गर्दी होती. बिंदू चौकाकडून आईसाहेबांच्या पुतळ्याकडे जाणारा मार्ग खोदाईसाठी बंद असल्याने सर्व वाहतूक शिवाजी पुतळा मार्गे वळविण्यात आली होती, त्यामुळे ही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

मुख्य लक्ष्मीपुरी बाजारात (laxmipuri market) मात्र पोलिस दिसत होते. ज्याठिकाणी अधिक गर्दी होत होती तेथील ग्राहकांना सूचना देऊन बाजूला घेण्याचे काम हे पोलिस (kolhapur police) करीत होते. राजारामपुरी परिसरातील (rajarampuri area) आईचा पुतळा परिसरात नार्वेकर मार्केट मधील विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा विक्रीसाठी बसले होते. त्यामुळे त्या परिसराची ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. तसेच शहरातील ठिकाणी कोपऱ्यावर आंबे विक्रेत्यांनीही गर्दी केली होती. काही भाजी विक्रेत्यांनी उपनगरातही भाजीचे स्टॉल उभा केले होते. तेथेही तुरळक ग्राहक दिसत होता.

कोल्हापुरात लॉकडाऊन शिथिल; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
Yaas चक्रीवादळ पुढच्या 24 तासात बंगालला धडकणार

कोल्हापुरातील अनेक वडापावच्या गाड्यावर सुद्धा काही ग्रामीण भागातून आणि शहरातील विक्रेत्यांनी तसेच खवय्ये यांनीही गर्दी केल्याचे दिसत होते. अशीच गर्दी बेकरी आणि दूध, पनीर खरेदी करण्यासाठीही दिसत होती. जिल्ह्यातील सर्व रास्त भाव रेशन दुकानावर धान्य उपलब्ध झाल्याने ते घेण्यासाठी रांगा दिसत होत्या. अनेक महिला या रांगेत हातात पिशव्या घेऊन उभारणल्याचे चित्र होते. मात्र सर्व दुकानांसमोर सोशल डिस्टन्स दिसून येत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com