esakal | Kolhapur Lockdown update :दुकाने उघडण्याबाबत तूर्तास निर्बंध कायम; शहरी, ग्रामीणसाठी यापुढे एकच नियम
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Lockdown : दुकाने उघडण्याबाबत  तूर्तास निर्बंध कायम

Kolhapur Lockdown : दुकाने उघडण्याबाबत तूर्तास निर्बंध कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: ‘अनलॉक’(Unlock) बाबत शहराला एक आणि ग्रामीण भागाला दुसरा असा न्याय असणार नाही. दुकाने उघडण्याबाबत जो काही निर्णय होईल, तो जिल्ह्यासाठी लागू होईल, असे संकेत राज्य शासनाकडून मिळत आहेत. दरम्यान, उद्या (ता. १२) पासून केवळ अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सुरू राहतील. अन्य दुकानाबाबत निर्बंध कायम असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे (dr. kadambari balkavde) यांनी ‘सकाळ''ला सांगितले.

दरम्यान, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या अकरा टक्क्यांपर्यंत आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत दर आठवड्याला यावर चर्चा होते. पुढील आठवड्यात दहा टक्क्यांच्या खाली पॉझिटिव्हिटी रेट आल्यास व्यापाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. कोरोना नियमासंबंधी कोल्हापूर जिल्हा सध्या शासनाच्या चौथ्या स्तरात आहे. अन्य दुकाने उघडण्यासाठी तिसऱ्या टप्यात कोल्हापूरचा समावेश होणे गरजेचे आहे, त्यासाठी पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या खाली येणे आवश्‍यक आहे. १ जुलैपासून जिल्ह्यात सुमारे दीड लाख लोकांच्या अँटिजेन टेस्ट तसेच आरटीपीसीआर चाचणी झाली आहे.

दुकाने ‘अनलॉक’ होण्यासाठी काही जिल्ह्यांत शहरी व ग्रामीण भागाचा पॉझिटिव्हिटी रेट ध्यानात घेण्यात आला. त्यानुसार शहरातील दुकाने सुरू झाली. मात्र, त्याचवेळी पालिका तसेच ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ लागला. इचलकरंजी येथे याच कारणावरून आंदोलन झाले. त्यामुळे यापुढे शहर तसेच ग्रामीण पॉझिटिव्हिटी वेगवेगळा न करता जो काही निर्णय लागू होईल, तो जिल्ह्यासाठी असेल, असे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा- आज फैसला; वर्णी कोणाची?सत्ताधारी ,विरोधक उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

सध्या अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत सुरू आहेत. गेल्या आठवड्यात पाच दिवसांची विशेष सवलत देऊन सरसकट सर्वच दुकानांना परवानगी दिली गेली होती. त्याची मुदत दोन दिवसांपूर्वी संपुष्टात आली. पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या खाली येत नाही, तोपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत. पुढील आठवड्यात सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या खाली आल्यावर तिसऱ्या स्तरातील निकष कोल्हापूरला लागू होतील. त्यानुसार अन्य दुकाने विशिष्ट वेळेत खुली होण्याचा मार्ग मोकळा होईल.

loading image