
Kolhapur Loudspeaker
esakal
Sound System Kolhapur : सानेगुरुजी येथील सागर सर्जेराव साळोखे (वय ३५) हे गेल्या रविवारी पत्नीसोबत शहरात येत असताना मंगळवार पेठेतील शाहू बँकेजवळ दोन मंडळांच्या साउंड सिस्टीम सुरू होत्या. केवळ अर्धा ते एक मिनिटच ते साउंड सिस्टीमच्या सान्निध्यात आले. पण, पुढे काही वेळातच त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. भयभीत झालेल्या साळोखे दांपत्याने हा प्रकार नातेवाइकांना सांगितल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.