Adinath Tirthankar idol abhishek Akshaya Tritiya
esakal
कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटकातील शेकडो श्रावक-श्राविकांची उपस्थिती, अक्षय्य तृतीयेचा शुभ दिन अन् मंगलमय व उत्साही वातावरणात काल सायंकाळी शुक्रवार पेठ येथील स्वस्तिश्री लक्ष्मीसेन जैन मठ येथे २८ फुटी भगवान आदिनाथ तीर्थंकर मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात आला. यंदाचे हे ६५ वे वर्ष असून, यावेळी १८ हून अधिक विविध प्रकारचे अभिषेक करण्यात आले.