कोल्हापूर : महापूरप्रश्नी आज मानवी साखळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Mahapurprashni human chain

कोल्हापूर : महापूरप्रश्नी आज मानवी साखळी

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील महापुराच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या (शुक्रवारी) कोल्हापूरकर एकवटणार आहेत. शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी ‘सकाळ’च्या पुढाकाराने मानवी साखळी होणार आहे. सकाळी नऊ ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत एकाच वेळी सर्व ठिकाणी मानवी साखळी होईल.

सतरा वर्षांपूर्वी २००५ मध्ये जिल्ह्याला कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर महापुराने विळखा घातला. त्यानंतर २०१९ आणि गेल्या वर्षी तर पुराची पातळी आणखीच वाढली आणि मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. एकूणच जिल्ह्यातील पुराच्या विविध कारणांचा अभ्यास ‘सकाळ’च्या माध्यमातून सुरू झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यातही विविध अंगांनी अभ्यास होणार असून, अंतिम अहवाल तयार करून तो शासनाला सादर केला जाणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच पूरग्रस्त भागातील लोकांच्या सहभागातून त्याला अंतिम स्वरूप येणार आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून मानवी साखळी होणार आहे. शासनाला जाग येण्यासाठी ही प्रातिनिधिक साखळी होणार असून, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात येथे होईल साखळी

जिल्ह्यातील विविध ठिकाणांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज पूल, व्हीनस कॉर्नर, रामानंदनगर पूल येथे सकाळी नऊ वाजता मानवी साखळीला प्रारंभ होईल. वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही, याची खबरदारी स्थानिक संयोजकांनी घेतली आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त कोल्हापूर सायकलिंग क्लबतर्फे सकाळी साडेसहाला शहरातून सायकल फेरी होणार आहे. ही फेरी झाल्यानंतर सर्व सायकलप्रेमी ताराराणी चौकात येतील आणि तेथे मानवी साखळी करतील.

Web Title: Kolhapur Mahapurprashni Human Chain Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top