कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच दोन पक्षांतील नेत्यांत सुरू असलेला वर्चस्ववाद प्रबळ इच्छुकांच्या मुळावर उठत आहे. .त्यातून चांगल्या उमेदवाराला एकतर आमच्याकडे ये असे सांगितले जाते; अन्यथा दुसऱ्या पक्षात तुला संधी नसल्याची भीती घातली जात आहे. एकमेकांना शह देण्याचा हा प्रकार महायुतीतच जास्त प्रमाणात दिसून येतो. प्रत्यक्ष उमेदवारांची यादी घोषित झाल्यानंतर हा सावळागोंधळ पुढे येण्याची शक्यता आहे..Ajit Pawar : ‘राष्ट्रवादी’कडून धक्कातंत्र? अजित पवार यांच्याकडून हालचाली.महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीत सर्वाधिक इच्छुक हे भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे पक्षाकडे आहेत. या दोन्ही पक्षांत जेवढे इच्छुक तेवढेच नेते झाले आहेत. प्रत्येक नेत्याकडून आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठीची व्यूहरचना आखली जात आहे. .उमेदवारीचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे सांगितले जात असले, तरी आपल्या पातळीवर जो प्रबळ आहे, त्याचा पत्ता कसा कापायचा याचीच रणनीती आखली जात आहे. त्यासाठी प्रभागात आम्ही सर्व्हे केल्याचे हत्यार उपसले जात आहे..Shashikant Shinde : अजित पवारांकडून अद्याप प्रस्ताव नाही; आघाडीबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्टीकरण.त्याला भाजप व शिवसेना शिंदे पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या वादाची किनार आहे. भाजप किंवा शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांतून अनेकांनी पक्षांतर करत या दोन पक्षांत प्रवेश केला. त्याचा सोहळाही मोठ्या प्रमाणात अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाला. .त्याचे व्हिडिओ व्हायरल करून इच्छुकांनी सलामीही दिली; पण आता अशाच इच्छुकांना त्या पक्षांतून उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. त्यातून पक्षांतर केलेल्या काहींनी मूळ पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली; पण तिथेही त्यांना स्थान नाही. अशा इच्छुकांनी आता अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. .अलीकडेच भाजपला रामराम करून शिवसेना शिंदे पक्षात गेलेले माजी नगरसेवक सत्यजित कदम व भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यातील शीतयुद्धाचे प्रतिबिंब उमेदवार निवडीत दिसत आहे. त्यात शहराचे आमदार म्हणून राजेश क्षीरसागर यांनी अंतिम उमेदवार निवडीचे अधिकार स्वतःजवळ घेतल्याचा फटका भाजपमधील काही तगड्या इच्छुकांना बसत आहे. .भाजपकडून उमेदवारी मागायची, तर त्या प्रभागातील शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांची समंती लागते; पण ती देताना भाजपपेक्षा तू आमच्या पक्षाकडून लढलास तर हे शक्य असल्याचे सांगितले जाते. .पण, पक्षांतर केल्यावर तरी उमेदवारी मिळेल का नाही? याची खात्री नसल्याने असे इच्छुक अन्य पर्यायांचा विचार करत असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे, तर काहींनी या त्रासाला कंटाळून निवडणूकच न लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशांकडून तशा पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.