

Kolhapur Market Committee
esakal
कोल्हापूर: येथील शेती उत्पन्न बाजार समितीची ई-नाम योजना प्रतिसादाअभावी गुंडाळली, तर कोल्डस्टोरेजचा प्रस्ताव बारगळला. बाजार समितीतील भूखंड तसेच शाहू सांस्कृतिक मंदिर भाडे करारावर देण्याचे निर्णय वादग्रस्त ठरले. अशा परिस्थितीत येथील बाजार समिती राष्ट्रीय कृषी बाजार संकल्पनेशी जोडता येणे शक्य आहे काय?, या अनुषंगाने पणनमंत्र्यांनी सखोल आढावा घ्यावा, अशी अपेक्षा बाजार समितीच्या जाणकारांतून व्यक्त होत आहे.