Kolhapur : बाजार समिती निवडणूक; दाखला मिळविण्यासाठी काही जणांचा खटाटोप

देणेकऱ्यांनी निवडणूक लढविणे धोक्यात
 शेती उत्पन्न बाजार समिती
शेती उत्पन्न बाजार समितीsakal
Updated on: 

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीकडे आर्थिक येणे-देणे नसल्याचे दाखले बेकायदेशीरपणे देऊ नयेत, असा अर्ज दोन व्यक्तींनी जिल्हा सहकार निबंधकांना दिला आहे. त्याची दखल घेत जिल्हा निबंधकांनीही बाजार समितीला या अर्जाची दखल घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीचे देणेकरी असलेल्यांना निवडणूक लढविणे मुश्कील होणार आहे.

शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना बाजार समितीकडे काहीही अर्थिक येणे-देणे नाही अशा आशयाचा दाखला घ्यावा लागतो. मात्र, बाजार समितीत गेल्या वीस वर्षांत अनेक गैरव्यवहार झाले.

 शेती उत्पन्न बाजार समिती
Kolhapur : गव्याच्या हल्ल्यात माजी उपसरपंचाचा मृत्यू

त्याच्या नुकसानीची वसुली झालेली नाही, अशा संचालकांनी यंदाच्या निवडणुकीसाठी बाजार समितीकडून येणे-देणे नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या संचालकांनी वसुलीची रक्कम न भरता असे दाखले देऊ नयेत, अशी मागणी संबंधित अर्जात आहे. तसेच वसुली रक्कम भरलेली नसतानाही असे बेकायदेशीरपणे दाखले देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असाही इशारा अर्जात आहे.

 शेती उत्पन्न बाजार समिती
Kolhapur : विरोध झुगारून विस्तारीकरण करणारच ; अमल महाडिक

दरम्यान, गेल्या बाजार समितीत तीन संचालक मंडळांच्या काळात गैरव्यवहाराचे आरोप झाले. चौकशी अहवालात गैरव्यवहार उघड झाले. त्याची नुकसानभरपाई संबंधित संचालकांकडून वसूल करणे अद्यापि प्रलंबित आहे.

असे असताना त्याच संचालक मंडळातील अनेकांनी यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे. तर काहीजण अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. अशांना बाजार समितीचे देणे नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी काहीजणांचा खटाटोप सुरू आहे. यात सहकार निबंधकांकडूनही वरील सूचना आल्याने वसुली रक्कम न भरलेल्या माजी संचालकांच्या उमेदवारी धोक्यात येण्याचा संभव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul election
Gokul election 2026 BJP Mahayuti candidates nomination
Kolhapur Gokul Election 2026 133 candidates 205 nomination forms
Gokul Milk Union Election Vishwas Patil Files Nomination With Five Others 15 Candidates Submit 19 Forms in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com