Rise of Fake Marriage Ads on Social Media
esakal
कोल्हापूर : ‘वयाची व जातीची अट नाही. मुलगा व्यावसायिक किंवा शेती करणारा, काम करून खाणारा चालेल. निर्व्यसनी सर्वसाधारण असावा....,’ अशा अपेक्षा लिहून एक पोस्ट व्हायरल केली जाते. लग्नाच्या प्रतीक्षेतील प्रत्येकालाच या अटी अत्यंत साध्या-सोप्या वाटतात. एका पाठोपाठ मुले या पोस्टमधील मोबाईलवर संपर्क करतात. ‘महिला अनाथ आश्रम, कोल्हापूर’ अशा नावाने राज्यभरातील मुलांची फसवणूक सुरू आहे. कोल्हापूरची बदनामी करणारा प्रकार तातडीने रोखण्यासाठी ठोस पावले (Kolhapur orphanage marriage fraud case) उचलण्याची गरज आहे.