कोल्हापूर : दोन वर्षांची असताना तिला पोलिओने गाठले... अपंगत्वावर मात करत तिने बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी भाषेत संवाद साधणाऱ्या सारिकाचे भागात कौतुकही व्हायचे. पण, अचानकपणे तिच्या स्वप्नांना नजर लागली. मानसिक स्थिती अचानकपणे बिघडत गेल्याने स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण उरले नाही. कोणालाही दगड मारणे, वाटेत वाहने अडविणे, दुकानांत शिरून तोडफोड अशा तिच्या कृतीमुळे तक्रारी वाढल्या.