Kolhapur Miraj Gulbarga Train : कोल्हापूर-मिरज-गुलबर्गा विशेष रेल्वे सेवेचा विस्तार! माढा, मोहोळ, अक्कलकोट, दुधनी, गाणगापूरला नवीन थांबे; आठवड्यातून पाच दिवस सेवा

Kolhapur Miraj Gulbarga special train 2026 : कोल्हापूर-मिरज-गुलबर्गा विशेष रेल्वेला पाच नवीन थांबे मंजूर झाले आहेत. माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी आणि गाणगापूर रोड येथे थांबा मिळाल्याने भाविकांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
Kolhapur to Gulbarga special train new stops

Kolhapur to Gulbarga special train new stops

esakal

Updated on: 

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर ग्रामीण व अक्कलकोट-गाणगापूर दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोल्हापूर-मिरज-गुलबर्गा या विशेष रेल्वे सेवेला नवीन थांबे मंजूर केले (Kolhapur Gulbarga special train new stops) आहेत. प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा आणि सोयीचा विचार करून भारतीय रेल्वेने तसा निर्णय घेतला असून, १४ नोव्हेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही गाडी धावणार आहे.

Loading content, please wait...