Kolhapur Moneylending Crime
esakal
कोल्हापूर : साडी विक्री, बॅटरी दुरुस्ती व्यवसायासाठी घेतलेल्या सहा लाखांच्या कर्जापासून सुरू झालेला सावकारी पाश अडीच कोटी रुपयांपर्यंत (Kolhapur Moneylending Case) गेला. वडिलांच्या भविष्य निर्वाह निधीतील पैसे, आईचे दागिने गहाणवट ठेवून रक्कम भागवली तरी कर्ज फिटले नाही. दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करण्याची भीती घालत सावकारांनी तब्बल दोन कोटी ५२ लाख रुपये वसूल केल्याची फिर्याद गीता स्वप्नील मोरे (वय ३२, रा. सोनाळी, ता. करवीर, सध्या रा. चिंतामणी पार्क, फुलेवाडी रिंगरोड) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली.