Kolhapur ST revenue during Diwali 2026
esakal
कोल्हापूर : यंदाच्या दिवाळी हंगामात कोल्हापूर एसटी विभागाच्या प्रवासी संख्येत तब्बल २ लाख ४० हजारांची घट झाली असली, तरी उत्पन्नात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत १ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांची घसघशीत वाढ झाली (Kolhapur MSRTC Diwali earnings 2026) आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या दहा दिवसांत विभागाला १५ कोटी ७९ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा हा आकडा सवलत मूल्यांसह १७ कोटी ११ लाख ६० हजारांवर पोहोचला आहे.